सामुहिक महाकाव्य २




सामुहिक महाकाव्य २

महाराष्ट्राच्या या महाकाव्याला
जोडणारे आम्ही नवखे तारे,
आध्यत्मिक संस्काराचे
सर्वञ वाहू लागले वारे...
प्रियंका ढोले/वायकोस. शिक्षिका,अहमदनगर
घासातील घास देणे असे संस्कृती
पाहुण्याचे आदरातिथ्य संस्कृती
स्त्री माते समान मानने संस्कृती महाराष्ट्राची अवर्णनीय संस्कृती रे
मनिषा नाझरे  महाड -रायगड
बोलीभाषा वेगवेगळ्या हीच आमची ओळख
कोकणी,वऱ्हाडी आहे फार खास
गोंडी, बंजारा,अहिराणी नाही यांना नाही मेख
वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत सुरेख
संजय कोंकमुट्टिवार प्रा.शिक्षक गडचिरोली
घासातील घास देणे असे संस्कृती
पाहुण्याचे आदरातिथ्य संस्कृती
स्त्री माते समान मानने संस्कृती महाराष्ट्राची अवर्णनीय संस्कृती रे
मनिषा नाझरे  महाड -रायगड
शिक्षिका
सप्त रंगाच्या मिलनातून
इंद्रधनुष्य उमटले नभी सारे,
भगव्या, हिरव्या, निळ्या रंगातून
एकतेचे वाहू लागले वारे...
प्रियंका ढोले/वायकोस.शिक्षिका,अहमदनगर.
एकनाथ तुकोबा ज्ञानदेवाने रचिला भक्तीचा पाया I
गर्जुनी सांगतीसहयगिरी
शिवशंभूच्या गाथा  I
फुले आंबेडकरशाहूराजांचा
समानतेचा नारा |
मनामनातून निनादतो मराठी
संस्कृतीचा बाणा !
कुंभारनिता विठोबा ( शिक्षिका )
उस्मानाबाद
कडेकपारी सह्यगिरीच्या घुमू लागले वारे,
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन् तारे.....
सहयगिरीचे वारे गाती शिवबाचे गुणगान,
महाराष्ट्राची माती माझी नररत्नांची खाण,
देवभूमीही इथे जन्मले पुण्यवंत सारे,
लावून टिळा या मातीचा पावन होऊ या रे. ........
सीमा कहडणे.पदवीधर शिक्षिका, जुन्नर, पुणे.
जगामधले उल्कापाताचे
एकमेव हे खार्यापाण्याचे
सरोवर आहे लोणारचे
भुषण हे महाराष्ट्राचे
बबन हनवंता आघाव (मांडवा कुर्हा) शिक्षक वाशीम
[02/05, 3:37 PM] Smita Navghare: महाराष्ट्र देश मनातला....भारताच्या हृदयातला... कडेकपारितून लढणाऱ्या.... महाराष्ट्रातील जवानाचा.......
प्रा.शारदा खेडकर.मुंबई
विविधतेतून एकता दिसे या माती
लोककलेचा वारसा जपतो किती
आगळी ही महाराष्ट्राची संस्कृती
अभंगांचे गोडवे अखंडओठीगाती
वर्षा राठोड
अहमदनगर
महाराष्ट्र माझा संत ,लढवय्ये शास्त्रज्ञांचा
महिमा गाजला जगी हो  तयांचा
ज्याचा मनी आमच्या ठसा आहे हो कायमचा
चला करू या जयजयकार ,आपल्या महाराष्ट्राचा
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
स्मिता लहू नवघरे.(शिक्षिका)
महाड- रायगड.
समूह प्रशासक उपक्रमशील शिक्षिका समूह
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जगप्रसिध्द लेण्या अन् जोर्तिलिंगाचे स्थान,
देवताला ही आवडलेली
महाराष्ट्राची भूमी महान...
प्रियंका ढोले/वायकोस.शिक्षिका,अहमदनगर.
नसावी कुणाच्याही प्रति,
नम्र असावी प्रत्येक व्यक्ती,
हीच शिकवण संत देती,
महाराष्ट्राची संस्कृती जपती।।
💐🌹💐🌹💐🌹💐
सौ. दीप्ती दिनेश गावंड(शिक्षिका)
महाड रायगड
💐🌹💐🌹
महाराष्ट्र देश मनातला....
भारताच्या हृदयातला...
कडेकपारितून लढणाऱ्या....
महाराष्ट्रातील जवानाचा.......
प्रा.शारदा खेडकर. मुंबई
मराठी आमी  मराठी आमची माणस
जगाला  दि ले नवचैतन्य   साहस  नवी द!लन
मोहिनी जगताप यवतमाल
या मातीचा गंध निराळा
तुका ज्ञानदेवाचा भरतो मेळा
मराठमोळा बाणा आगळा
रंगला महाराष्ट्र दिनाचा सोहळा
वर्षा राठोड
अहमदनगर
*** माझा महाराष्ट्र ****
माझा माझा महाराष्ट्र माझा..
अखंडराहो सदा महाराष्ट्र माझा..
मनोमनी वसला महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
शेख जावेद
सह शिक्षक  ,औरंगाबाद
_
गुंफण करूया माणसामाणसांची,
निर्मिती करूया शसक्त महाराष्ट्राची!
सुजलमं सुफलमं करू माती महाराष्ट्राची,
देशात मिरवू गुढी अभिमानाची!
सौ पूजा अमोल शहा (विषय शिक्षिका) रायगड
महाकाव्य स्पर्धेसाठी
१ मे १९६० या दिनी
स्थापना झाली महाराष्ट्राची
इतिहासातील सोनेरी पानात
गाथा माझ्या महाराष्ट्राची
प्राची देशपांडे
कँलिफोर्निया
भाग्य लाभले वाणी मराठी
म्हणून शिकलो  अ , आ ,- ई -  मराठी
शूर विरांची  ही संस्कृती मराठी
आमची शान माय मराठी
संध्यारजनी बळीराम सावकार
केंद्रप्रमुख _रा सेगाव
जिनासिक
कणखर बाणा सह्याद्रीचा
शुध्द जलधारा गंगेची
वसा जिजाऊंंच्या संस्कारांचा
मायाळू माती महाराष्ट्राची
बबन हनवंता आघाव (मांडवा कुर्हा) शिक्षक वाशीम
गडकिल्ल्यांनी नटला महाराष्ट्र
कोकणाची शान असे महाराष्ट्र
सौंदर्याने फुलला महाराष्ट्र
म्हणूनच म्हणते हा माझा महाराष्ट्र
वृंदा संतोष पगडपल्लीवार, शिक्षिका
जि.चंद्रपूर
भूषण आम्हालाआशा उषा अन् गानकोकिळा लता,
भास्कराचार्याने शून्याचा हा शोध दिला जगता,
एकनाथांची गाथा अन् ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी हीच आमची गीता,
बहिणाबाईने दिली आम्हाला अहिराणी कविता.
अमृतसिंग  नवलसिंग राजपूत,प्राथ.शिक्षक, नंदुरबार
महाराष्ट्र आमचा महान
आम्हाला त्याचा अभिमान
धर्म जाती विविध पंथ येथे
एकोप्याने सारे नांदती छान
प्राची देशपांडे
कँलिफोर्निया
महाराष्ट्राच्या या मातीला
सुगंध आहे आपुलकीचा
आपुलकीच्या या गंधाला
स्नेह आहे राष्ट्रभक्तीचा
*निलेश नरोत्तम पाटील*
प्राथमिक शिक्षक-पालघर
सुंदर अप्रतीम महाराष्ट्र देशा,
लाभले यास फूले, आंबेडकर, शिवरायांचा वारसा.!
येथे वाहतात नद्या संथपणे चारही दिशा,
संतांची वाणी जागवते लेकांमध्ये जगण्याची आशा!!
उज्वला कुदरे सोलापूर..
सह्याद्रीचे कडाकपारी गाती
महाराष्ट्राचे सुंदर गौरवगान
आम्ही नागरिक या भूमीचे
आम्हा महाराष्ट्राचाअभिमान
प्राची देशपांडे
कँलिफोर्निया
महाराष्ट्र हि भूमी संतांची
मांगल्याची,संस्कारांची
या भूमीला वंदन करतो
सदा सर्वदा तिलाच नमितो
*निलेश नरोत्तम पाटील*
प्राथमिक शिक्षक-पालघर
एकशे पाच हुतातम्यांनी सांडीले रक्त।।
तेंव्हा निर्माण झाला महाराष्ट्र संयुक्त।।
कामगारांच्या अंदोलनात ठरले हे सुक्त।।
आठ तास काम,आठ तास आराम,आठ तास जगण्यासाठी मुक्त।।
गावडे प्रमिला बापूराव(शिक्षिका)
श्रीगोंदा,अहमदनगर

कष्टकरी शेतकऱ्यांचा
दीन ,दलित ,दुबळ्यांचा
हुतात्म्यांच्या बलिदानाचा
महाराष्ट्र माझा जिगरबाज मावळ्यांचा ..
गावडे प्रमिला बापूराव(शिक्षिका)श्रीगोंदा, अहमदनगर
भिन्न जाती धर्म पंथ अन् भिन्न ही भाषा।
श्रद्धास्थाने भिन्न आमुची तरीही एक दिशा।
भिन्न भिन्न ही बोली परी ही एक राष्ट्रभाषा।
त्रिवार वंदन आमुचे तुजला महाराष्ट्र देशा।
रंजना लसणे (शिक्षिका )
आखाडा बाळापूर
जिल्हा हिंगोली

: या मातीचा गंध निराळा
तुका ज्ञानदेवाचा भरतो मेळा
मराठमोळा बाणा आगळा
रंगला महाराष्ट्र दिनाचा सोहळा
वर्षा राठोड  (शिक्षिका)अहमदनगर
दिल्लीच्या रक्षणा
सदा सह्याद्री जातो धावुनी!!
महाराष्ट्राच्या  उज्वल परंपरेत
माझा भारत जातो न्हाऊनी!!!!
💐🌹💐🌹💐🌹💐
सौ. दीप्ती दिनेश गावंड(शिक्षिका)
महाड रायगड
💐🌹💐🌹
विविधतेतून एकता दिसे या माती
लोककलेचा वारसा जपतो किती
आगळी ही महाराष्ट्रची संस्कृती
अभंगांचे गोडवे अखंडओठिगाती
वर्षा राठोड(शिक्षिका)अहमदनगर
वंदन करितो शिवरायांना, जपतो शिकवण तुकोबांची ।
महाराष्ट्र भूमी ही बाबसाहेबांसम अभिमानी रत्नांची ।।
शपथ सह्याद्रीच्या कुशीतील कोकणापासून विदर्भाच्या मातीची ।
पुण्यवान जाहलो जन्मलो जेथे वाहतात कृष्णा गोदावरी अन चंद्रभागा विठ्ठलाची ।।
तन्मय रश्मी संजय जाधव (नाशिक)
इथं संत  विश्वाचें कल्याण देवाकडे मागती
इथं विठूनामाचा गजर वारकरी  करती
लाेककला महाराष्ट्राची जनजागृति  करती
शूरविरांचे पाेवाडे ऐकता येती अंगावरी शहारे
जयगान गाती महाराष्ट्राचे नभीं सूर्य अन् तारे!
मनिषा  खामकर,शिक्षिका, पुणे
महाराष्ट्राच्या शौर्याची तुतारी  निनादती !
नररत्नांच्या खाणी इथेच जन्मघेती .
विश्वासाठी पसायदान माऊली मागती.
महाराष्ट्रदिनी सुगंधीस्मृतींचे काव्य निर्मिती.
गुप्ते शोभा रामचंद्र जि. पुणे

रांगडी माती, रांगडी लेकरं , रांगडा आमुचा बाणा...............
लोभस रुपडे नित्य दिसावे हीच मुखी प्रार्थना...........
तुझ्या मातीचा टिळा लावितो वीर तुझा देखणा...........
परंपरा अन हीच संस्कृती उभी देतसे नारे !! जय गाणं गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन तारे!!                     
कु वर्षा दादाजी चुधरी (सौ.चडगुलवार)
शब्द ही उणे येथे
गुणगान गाऊ राष्ट्राची किती,
येती-जाती विभिन्न संस्कृती
बदलली नाही आमची नीती..
प्रियंका ढोले/वायकोस.शिक्षिका,अहमदनगर.
मदतीचा हात सदैव दिला
पाहिला ना कधी शञूचा वार,
महाराष्ट्राच्या या नीतीला
मानाचा मुजरा वारंवार.....
प्रियंका ढोले/वायकोस. शिक्षिका, अहमदनगर.
शूर मराठे सरदार पाहूनी गनिमही थरथरती I
दिल्लीचेही तख्त राखीले सळसळत्या तलवारीनी I
रक्तरंजीत शौर्य गाथा मनामनात वसती |
जिजाऊ आहिल्या सावित्रीच्या कार्याला करीती नमन सारे I
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन् तारे
श्रीम कुंभार निता विठोबा
उस्मानाबाद
महाराष्ट्राची शौर्यकथा सांगती सह्याद्रीचे वारे,
शिवबा,शंभूराजे अन जिजाऊ ,मावळे अद्वितीय सारे
शाहू,फुले अन बाबासाहेब
क्रांतीची होते मशाल रे
पवित्र भूमी संताची ही महती वर्णूया रे
जयगान गाती महाराष्ट्राचे चंद्र,सूर्य अन तारे
सविता राहिंज (शिक्षिका) अहमदनगर
प्रगतीचा शिखर गाठण्याचा
लागला आम्हां ध्यास रे,
महाराष्ट्राच्या नसानसातून वाहे
संस्कारांचा सुवास रे....
प्रियंका ढोले/वायकोस.शिक्षिका,अहमदनगर.
सुंदर अप्रतीम महाराष्ट्र देशा,
लाभले यास फूले, आंबेडकर, शिवरायांचा वारसा.!
येथे वाहतात नद्या संतपणे चारही दिशा,
संतांची वाणी जागवते लोकांमध्ये जगण्याची आशा!!
उज्वला कुदरे सोलापूर..
सह्याद्रीच्या कडे कपारी
जयघोष करी वारकरी
टाळ अन् मृदंग तुतारी
शोभे तुळस डोईवरी
मनिषा पुंड-पर्वत (शिक्षक) औरंगाबाद
हिरवाईने नटलेला वैभवसंपन्न किनारा
जिजाऊचा शिवाजी सर्वांनाच प्यारा
सावित्री अन् ज्योतिबाच्या शिक्षणाचा वारा
दाही दिशांना वाहे महाराष्ट्राचे वारे
जयगान गाती महाराष्ट्राचे नभी सूर्य अन् तारे||
मनिषा पुंड-पर्वत  (शिक्षक) औरंगाबाद
महाराष्ट्राची भूमी आहे डोंगराळ
आणि दगड धोंडयाची खडकाळ
छत्रपती शिवाजींनी लढा दिला
युक्तीने, गनिमीकाव्याने
मुघल अफाट सैन्याशी
आणि झाला शत्रुचा कर्दनकाळ
सौ.वंदना विश्वास पाटील
रायगड (शिक्षिका)
प्रेमळ,उत्तम शिक्षक गौरव साने गुरुजींचा
रोमांच उठे अंगावर पाहुन त्याग सावरकरांचा
कुसुमाग्रज गाजविती अभिमान मातृभाषेचा
चला करू जयजयकार आपल्या महाराष्ट्राचा.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
स्मिता लहू नवघरे.(शिक्षिका)
महाड- रायगड.
जगात नवनवीन जन्म घेई कला
महाराष्ट्राचा अभिमान मला,
मायबोलीच्या अविष्कारातून
महाकाव्याची रचना करूया चला...
प्रियंका ढोले/वायकोस.शिक्षिका,अहमदनगर.
सह्याद्री, डोंगर दर्‍यातुन निनादे नदीचे पाणी, महाष्ट्राची विजयगाथांची अन विविधतेची हि सृष्टी गाते गाणी.——*——*——*——*——*——*——*रेखा डाळिंबकर(शिक्षिका)अहमदनगर.
महाराष्ट्राच्या मातीत रुजली
संस्काराची मुळे,
कला गुणांना देती दाद
महाकाव्याची रचना जुळे...
प्रियंका ढोले/वायकोस.शिक्षिका,अहमदनगर
स्ञीशिक्षणाचे पेरले इथे बीज
जगात हक्कासाठी कडाडली वीज, अन्यायाने केली मनाची झीज
झाले साविञीच्या कष्टाचे चीज..
प्रियंका ढोले/वायकोस. शिक्षिका,अहमदनगर
नवरत्नांची खाण जणू ही
महाराष्ट्राची धरणी,
संस्काराने घडवी मानवा
ऐसी मायबोलीची करणी...
प्रियंका ढोले/वायकोस.शिक्षिका,अहमदनगर
रांगड्या खडकातील
थंड पाणी माझा महाराष्ट्र
तुकया ज्ञानोबाचा अभंग
माझा महाराष्ट्र
कांचन घोडे
पुणे
माझ्या महाराष्ट्राच्या संस्क्रुतीचा
काय वर्णावा महिमा
तिच्या न्यानाला,प्रेमाला,
पावित्र्याला नाही भेदभावाची सीमा........
स्मिता लहू नवघरे.(शिक्षिका)
महाड-रायगड..

शिक्षणाचे महत्व मानवाचा सर्वागीण विकास हा शिक्षणावरच अवलंबून आहे. तसेच माणूस आणि पशु या दोघांमधील अंतर ओळखायचे साधन म्हणजे शिक्षण होय. प...