माझ्या काव्यरचना

**************************
भारत रत्न - भीमराव आंबेडकर 
**************************

दीन दलितांचा कैवारी 
जन्मला या भू वरी 
नाव तयाचे कोरले
प्रत्येकाच्या अंतरी II १II
      बहुजनांचा पालन हार 
      बंध मुक्त करून दिला आधार 
      केला सहन अन्याय अत्याचार
      नाही केला स्वतःचा विचार II २II
सूर्य जसा तळपतो अंबरी
तशी किर्ती गाजते दिगंतरी
महामानव बोलती सारी
भीमराया तुम्हा नमन करती सारी II ३II
         अस्पृश्यांचा करुनी उद्धार
          केले तयांचे जीवन साकार
         बौद्ध धर्माचा करुनी स्विकार
          मानवतेचा केला प्रचार II३II
तुम्हीच आहात आमचे आधार 
घटनेचा होऊनी शिल्पकार
दिला संविधानाला आकार 
त्यानुसारच चालतो कारभार II४II
      जातीभेदाला नाही दिला थारा
     शिका संघटीत व्हा समाज सारा
      साऱ्या जगाला मंत्र दिला न्यारा 
      आम्हा सर्वांचा आहेस प्यारा II५II
तुम्हामुळे बहुजनांना मान आहे
तुम्ही लिहिलेल्या संविधानाचा
आम्हा भारतीयांना अभिमान आहे
     " भारतरत्न पुरस्कार "
हाच खरा तुमचा सन्मान आहे 
हाच खरा तुमचा सन्मान आहे  II६II
          
               रचना-
श्री. सुदाम नारायण साळुंके
मु.पो.खडकवाडी , ता. - पारनेर
        जि. अहमदनगर
   मो.नं. ८८३०३३४८१०
****************************



                   *आठवणी*
*........काही .........*
आठवणी आठवतात ,
आठवणी विसरतात ,
आठवणी दुखावतात ,
आठवणी सुखावतात ,
आठवणी हसवतात   , 
आठवणी रडवतात , 
आयुष्यात शेवटी 
  *आठवणीच*
.... राहतात .... 

Sudam Salunke
@#@#@#@#@#@#@#@#@#

        " कोरोनो " के लिए ये करोनो

काम धंदा सोडून गर्दीत फिरणे टाळा
गर्दीमध्ये जाताना मास्क लाव बाळा
तरच "कोरोनाच्या" संसर्गाला बसेल आळा ॥ १॥
नका लावू हात विनाकारण तोंडा आणि डोळा
सर्दी , खोकला झाला तर  डॉक्टरकडे जा वेळोवेळा
तरच "कोरोनाच्या" संसर्गाला बसेल आळा  ॥२॥
लहान मुल आणि वृद्धांना जपा या वेळा
लक्ष ठेवा त्यांच्यावर वेळोवेळा
तरच "कोरोनाच्या" संसर्गाला बसेल आळा  ॥३॥
सुट्टी दिली मुलांना बंद केल्यात  शाळा
अभ्यासाचा लावा त्यांना तुम्ही लळा
तरच "कोरोनाच्या" संसर्गाला बसेल आळा ॥ ४॥
महत्वाच्या कामासाठी जा एक वेळा
विनाकारण नका फिरू गावातल्या गल्लीबोळा
तरच "कोरोनाच्या" संसर्गाला बसेल आळा  ॥ ५॥
जाणवली लक्षण तर दवाखान्यात जा वेळोवेळा
नका लपवू आजाराला करा उपचार योग्य वेळा
तरच "कोरोनाच्या" संसर्गाला बसेल आळा  ॥ ६॥
कोणत्याही समारंभात नका होऊ गोळा
शासनाने सांगितलेले  लॉकडाऊनचे नियम तुम्ही पाळा
तरच "कोरोनाच्या" संसर्गाला बसेल आळा  ॥ ७॥
      श्री. सुदाम साळुंके सर
       खडकवाडी , ता- पारनेर
         मो.नं. 8830334810
@$@$@$@$@$@$@$@$@$@$

कोरोना गीत 

आर माणसा रं माणसा
का उगा फिरतोस असा रे कसा॥
कोरोनाच्या संसर्गापाईत
जीव जाईल खाईत 
   आर माणसा रं माणसा
   का उगा फिरतोस असा रे कसा॥
कोरोना आहे जीवघेणा व्हायरस
त्यान श्वसनसंस्था होते खल्लास
सर्दी ताप अन खोकल्यान
होईल जीवाची घालमेल 
    आर माणसा रं माणसा
   का उगा फिरतोस असा रे कसा॥
नको फिरू उगा गावभर
बाहेरून घरी आल्यावर 
साबणाने हात धू वारंवार
त्यानेच  विषाणू नष्ट होणार 
     आर माणसा रं माणसा
   का उगा फिरतोस असा रे कसा॥
गर्दीत जाऊ नको वारंवार
हात लावू नको नाकातोंडावर
कर मास्क अन सॅनिटायझरचा वापर 
होणार नाही संसर्ग खात्रीशीर 
    आर माणसा रं माणसा
   का उगा फिरतोस असा रे कसा॥

कोरोनाचा संसर्ग झाल्यावर
नको लपवून ठेवू आजार
दवाखान्यात कर लवकर उपचार
तरच वाचेल सर्व घरदार
   आर माणसा रं माणसा
  का उगा फिरतोस असा रे कसा॥
घरी रहा सुरक्षित रहा
सांगतय आपल सरकार
करू नियमांच पालन काटेकोर
तरच कोरोना होईल हद्दपार
      आर माणसा रं माणसा
    का उगा फिरतोस असा रे कसा॥


         काव्य रचना

श्री. सुदाम साळुंके सर

@$@$@$@$@$@$@$@$@$@


 स्वप्न परी
आहे एक नाजूक परी
राहते प्रत्येकाच्या अंतरी
भेटावे वाटते एकदा तरी
परी तुला शोधू कुठवरी
स्वप्नातली राजकुमारी
मनाला वेड लावणारी
रूपाने आहेस गोजिरी
तू आहेस स्वप्नसुंदरी
किती प्रेम करतो तुजवरी
तुला सांगेल कधीतरी 
येतो विचार अंतरी
शोधत फिरतो वनचरी
नजर शोधते भिरभिरी
नाही भेटलीस आजवरी
तरी भास होतो खरोखरी
सांग तू मला सत्वरी
भेटशील का एकदा तरी ?

 काव्य रचना
श्री. सुदाम साळुंके सर
@$@$@$@$@$@$@$@$@$@$




शिक्षणाचे महत्व मानवाचा सर्वागीण विकास हा शिक्षणावरच अवलंबून आहे. तसेच माणूस आणि पशु या दोघांमधील अंतर ओळखायचे साधन म्हणजे शिक्षण होय. प...